बापूसाहेब भोसले चॅरिटेबल ट्रस्ट, कोल्हापूर मध्ये आपले स्वागत आहे
इतरांच्या जीवनात बदल करण्याचा सर्वोत्तम मार्ग


ट्रस्ट बद्दल
बापूसाहेब भोसले चॅरिटेबल ट्रस्ट ,कोल्हापूर बाबत प्राथमिक माहिती
डॉ.बापूसाहेब कृष्णा भोसले आणि डॉ.लतिका बापूसाहेब भोसले यांनी त्यांचा एकत्रित प्रवास सन १९६८ मध्ये सुरू केला.डॉ.लतिका या शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय अधिकारी होत्या आणि डॉ. बापूसाहेब कृष्णा भोसले हे खाजगी दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा देत होते.वैद्यकीय सेवा देण्याबरोबर समाजातील दिनदुबळ्या लोकांना शिक्षणाचे महत्व सांगून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत केले किंबहुना शिक्षण घेण्यासाठी शाळेत, महाविद्यालयात ऍडमिशन घेण्यासाठी मदत केली. गरीब जनतेला वैद्यकीय सेवा मोफत दिली.मोठ्या आजाराने ग्रस्त लोकांना स्वखर्चाने ग्रामीण , दुर्गम भागातून कोल्हापूर येथे आणून पुढील वैद्यकीय सेवा देण्यासाठी काम केले. अशा व्यक्तींची कोल्हापूर येथील घरात रहाण्याची सोय केली.विद्यार्थ्यांच्या फी भरणे,त्यांना पुस्तके देणे,गणवेशाची व्यवस्था करणे .तसेच,भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, खाऊ घालणे अशी कामे डॉ.बापूसाहेब कृष्णा भोसले आणि डॉ.लतिका बापूसाहेब भोसले हे करत असत.आजपर्यंत जवळपास २००० विद्यार्थ्यांना मदत केली असून ते विविध क्षेत्रात काम करत आहेत. हे सामाजिक भान स्वकमाईतून चालू होते आणि आताही आहे.
आमच्या सेवा

वैद्यकीय :
गरीब व वंचित लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व सुविधा उपलब्ध करून देणे, ( ट्रस्ट मार्फत उभारण्यात येणार्या हॉस्पिटल मार्फत )तसेच अपघात, आपत्कालीन, आजारपणात रुग्णवाहिका देऊन गरजू लोकांची सोय करणे.

शैक्षणिक :
ट्रस्टच्या माध्यमातून शाळांमधील विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी वर्गांना मार्गदर्शन करणे, मार्गदर्शन शिबिरे आयोजित करणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक उपलब्ध करून देणे.

कला/क्रीडा :
युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण करणे. तरुणांना विविध खेळांचे अद्ययावत प्रशिक्षण देणे, त्यांच्यातील लपलेल्या कलागुणांचा विकास करणे.

शेती :
शेतकऱ्याला कृषी व अनुषंगिक शेती व्यवसायाबाबत विषय तज्ञांचे मार्गदर्शन मिळवून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे.

पर्यावरण :
पर्यावरण संतुलनासाठी विविध उपक्रम राबवणे, उदा. वनीकरण, वृक्षतोड बंदी आणि पर्यावरण जागृती कार्यक्रम राबविणे.