ट्रस्ट बद्दल

ट्रस्ट बद्दल

बापूसाहेब भोसले चॅरिटेबल ट्रस्ट ,कोल्हापूर बाबत प्राथमिक माहिती

डॉ.बापूसाहेब कृष्णा भोसले आणि डॉ.लतिका बापूसाहेब भोसले यांनी त्यांचा एकत्रित प्रवास सन १९६८ मध्ये सुरू केला.डॉ.लतिका या शासकीय सेवेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय अधिकारी होत्या आणि डॉ. बापूसाहेब कृष्णा भोसले हे खाजगी दवाखान्यामार्फत वैद्यकीय सेवा देत होते.वैद्यकीय सेवा देण्याबरोबर समाजातील दिनदुबळ्या लोकांना शिक्षणाचे महत्व सांगून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत केले किंबहुना शिक्षण घेण्यासाठी शाळेत, महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मदत केली. गरीब जनतेला वैद्यकीय सेवा मोफत दिली.मोठ्या आजाराने ग्रस्त लोकांना स्वखर्चाने ग्रामीण , दुर्गम भागातून कोल्हापूर येथे आणून पुढील वैद्यकीय सेवा देण्यासाठी काम केले. अशा व्यक्तींची कोल्हापूर येथील घरात रहाण्याची सोय केली.विद्यार्थ्यांच्या फी भरणे,त्यांना पुस्तके देणे,गणवेशाची व्यवस्था करणे .तसेच,भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, खाऊ घालणे अशी कामे डॉ.बापूसाहेब कृष्णा भोसले आणि डॉ.लतिका बापूसाहेब भोसले हे करत असत.आजपर्यंत जवळपास २००० विद्यार्थ्यांना मदत केली असून ते विविध क्षेत्रात काम करत आहेत. हे सामाजिक भान स्वकमाईतून चालू होते आणि आताही आहे.
ट्रस्टी डॉ.लतिका बापूसाहेब भोसले या मुंबई येथून आयुर्वेदात पदवी घेऊन जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आपली सेवा दिली.ग्रामीण,दुर्गम, डोंगराळ भागात काम केले.महाराष्ट्र परिवहन विभागाच्या एस.टी.बस सेवा उपलब्ध नव्हत्या.अशावेळी पायी प्रवास करून ,बैलगाडीने प्रवास करून महिलांचे बाळंतपण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले.विविध वैद्यकीय दवाखान्यात उत्तमरितीने काम केले,त्याकरीता बरेच पुरस्कार प्राप्त झाले. सन १९९२ मध्ये त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत.

ट्रस्टच्या सेक्रेटरी डॉ.शर्मिला बापूसाहेब भोसले यांनी शासकीय दंत महाविद्यालय मुंबई येथून दंतशल्य चिकित्सक पदवी प्राप्त केली. त्यांना मुंबई विद्यापीठाचे प्रतिष्ठेचे अल्यूमिनी अवॉर्ड अनाटोमी विषयासाठी मिळालेले आहे.त्यानंतर सन १९९९ पासून कोल्हापूर येथे दाताचा दवाखाना भाडे तत्वावर जागा घेऊन सुरू केला आणि २००३ साली स्वतःच्या जागेमध्ये दवाखाना स्थलांतर केला. दवाखान्यात सर्व प्रकारच्या दंत सेवा अल्प दरात देण्यात येतात.गरीब,महिला यांच्या करीता शिबिरे भरवून अल्प दरात त्याना उपचार देण्यात येतात.

अध्यक्ष श्री शिवराज बापूसाहेब भोसले यांनी आय.एम.ई.(मेकॅनिकल इंजिनिअर )पदवी घेतली.या बरोबर अनेक विषयातील डिप्लोमा केलेले आहेत. सन २००० मध्ये स्वतःचा व्यवसाय चालू केला.दंतशल्य चिकित्सक यांना लागणारे कोम्प्रेसरची निर्मिती केली,दंतशल्य विभागाला लागणारे साहित्याची डिलरशीप चालू केली.त्यानंतर कृष्णा कंन्सल्टन्सीची निर्मिती सन २००५ मध्ये करण्यात आली आणि त्या मार्फत लॅड डेव्हलपमेंट, पेपर सप्लाय, फार्मिंग वगैरे कामकाज चालू केले .विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा देण्याकरीता मार्गदर्शन करत असतात.तसेच,लोकांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय उभारण्यासाठी ,घरे बांधण्यासाठी मदत करत असत व करत आहेत.

ट्रस्टच्या मार्गदर्शक डॉ.दीपा बापूसाहेब भोसले यानी शासकीय दंत महाविद्यालय मुंबई येथून दंतशल्य चिकित्सक पदवी प्राप्त केली. त्यानंतर मिरज मेडीकल सेंटर या महाराष्ट्र- कर्नाटक राज्यात किंबहुना परदेशातही सुप्रसिद्ध वानलेस हॉस्पिटल मध्ये हेड ऑफ दि डिपार्टमेट व कन्सलटंट म्हणून सन १९९६ ते सन २००२ पर्यंत काम केले.हॉस्पिटल च्या माध्यमातून सर्व स्तरातील घटकाना उत्तम दंत सेवा दिली.शासकीय कर्मचारी विशेषतः पोलीस विभाग ,गरीब दीनदुबळ्या लोकांसाठीच्या शिबिरात सहभाग घेतला.त्यानंतर त्यांनी एम.पी.एस.सी.परीक्षा देऊन महाराष्ट्र शासनामध्ये तहसीलदार म्हणून रूजू झाल्या .सध्या उपजिल्हाधिकारी या पदावर कार्यरत आहेत.

संपूर्ण कुटुंबीय हे वैद्यकीय व दंतशल्य चिकित्सक क्षेत्रात नावाजलेले आहे. डॉ.बापूसाहेब कृष्णा भोसले व डॉ.लतिका बापूसाहेब भोसले यांनी चालू केलेली समाजातील गरजू लोकाच्यासाठी मदतीची चळवळ मुले डॉ.शर्मिला, डॉ. दीपा व श्री. शिवराज यांनी पुढे चालू ठेवली आहे. डॉ.बापूसाहेब भोसले यांचे सन २०१७ मध्ये कर्करोगाने निधन झाले व त्यानंतर चालू असलेले काम हे मोठ्या प्रमाणावर,संघटीत व मूर्त स्वरूपात करण्याच्या उद्देशाने बापूसाहेब भोसले चॅरिटेबल ट्रस्ट , कोल्हापूर ची स्थापना करण्यात आली.

आमचे स्वयंसेवक

विश्वस्त

श्री. बापूसाहेब भोसले

आमचे स्फूर्तीस्थान

डॉ.लतिका बापूसाहेब भोसले

विश्वस्त

श्री. शिवराज बापूसाहेब भोसले

अध्यक्ष

डॉ. दीपा बापूसाहेब भोसले

मार्गदर्शक

डॉ. शर्मिला बापूसाहेब भोसले

सचिव